Skip to main content

Posts

माझ्या रांडेसारख्या कवितेला मी कधीच तुमच्या गल्लीत फिरकू देत नाही तुमच्या गल्लीत म्हणे गळ्यात मंगळसूत्र घालून स्वतःला सुंस्कृत म्हणवत  कविता उभ्या असतात तुमच्या कवितांना इर्शाद आणि दर दोन्हीही जास्त मिळतो आमच्या कविता तितक्या कमाई करत नाहीत पण..पण, छापेमारीत आमच्या कविता सापडतात तेव्हा त्या तुमच्या कवितांसारखं तोंड झाकून जात नाहीत कारण आमच्या धंद्यांचा एक वसूल आहे गिर्हाईकाला झुरवत झुलवत बसायचं नाही मग नफा होवो अगर तोटा कारण नावाला मंगळसूत्र घालून पतिव्रता होत नाही कुठली कविता...
Recent posts

सत्कार

सत्कार, कौतुक, मान-सन्मान या साऱ्या गोष्टी कुत्र्याच्या गळ्यात बांधलेल्या पट्ट्यासारख्या. त्या तुम्हाला हवं तिकडं स्वैर होऊ देत नाहीत. आणि तुम्ही त्या एकाच गोष्टीभोवतीच फिरत रहाता सारा आवाका धुंडाळल्याच्या दिमाखात.....                 माझ्या वाट्याला अपमान यावा आयुष्यभर पण सन्मान,सत्कार नको...!!!                                                                       #खाडाखोड
मुळासकट उपटून टाक मला एकदाच पण सारखं सारख खोडावर घाव घालत राहू नकोस कितीदा आशेने उगवत राहू मी पुन्हा पुन्हा जिथून तुटलोय तिथून ©विजयबिळूर

खोडावर घाव

Leaf

The yellow leaf fell down On the polished tar road & The air of a van Forcefully push him Outside आणि एक अनवाणी माणुस खिशातले शेंगदाणे चावत चावत जाताना सहजच ते पिवळं पान उचलून निघाला रास्तेमे एक भले इंसान ने लिफ्ट देदी तो वो पत्ता उधर हि फेककर वो उस...

पारतंत्र्य

देश स्वतंत्र झाला पण माणसं नाहीत ती रोज कुठल्या ना कुठल्या तरी पारतंत्र्याखाली आहेतच ते कधी स्वतंत्र होणार कोणास ठाऊक ? आणि झालेच तर त्यांचा झेंडा कोणत्या रंगाचा असे...