एक खिळा ठोकलाय त्यांनी भीतींत
त्याच्यां देवाचा फोटो लावायला
पण त्याच भींतीच्या पलीकडच्या बाजुला
एक चिर गेलीय मोठी
तिकडे त्याच्यां देवाचा फोटो लावायला
त्यांनीपण त्याच भींतीला खिळे ठोकलेयत
आता ईकडे चिर पडल़ेय
आता कोणता देव मोठा ही शर्यत लागुन
दोन्हीकडुन शिरलेले खिळे
एकमेकांना भींतीच्या पोपडयाआड धरुन
कारण ते ओळखुन आहेत.
फोटो पडला तर भीतं पडेल
आणि नवी भीतं तयार होईल
ज्यांना फोटो नसतील, खिळे नसतील
माणसं पडतील पण भींत तशीच
तटस्थ असेल...
त्याच्यां देवाचा फोटो लावायला
पण त्याच भींतीच्या पलीकडच्या बाजुला
एक चिर गेलीय मोठी
तिकडे त्याच्यां देवाचा फोटो लावायला
त्यांनीपण त्याच भींतीला खिळे ठोकलेयत
आता ईकडे चिर पडल़ेय
आता कोणता देव मोठा ही शर्यत लागुन
दोन्हीकडुन शिरलेले खिळे
एकमेकांना भींतीच्या पोपडयाआड धरुन
कारण ते ओळखुन आहेत.
फोटो पडला तर भीतं पडेल
आणि नवी भीतं तयार होईल
ज्यांना फोटो नसतील, खिळे नसतील
माणसं पडतील पण भींत तशीच
तटस्थ असेल...
Comments
Post a Comment