Skip to main content
लोकं म्हणतात मी
वाईट, फालतु माणूस आहे 
कारण मी रस्त्यावर पडलेली
स्त्रियांची अंतरवस्त्र गोळा करत 
फिरतो 
तसही त्यांची काहीच 
चूक नाही म्हणा
कारण रसत्यावर पडलेली प्रत्येक
गोष्ट कचरा आहे
असच भिनलय त्यांच्या
मखमली रेशमी डोक्यात

लोक म्हणतात मी
वाईट, फालतु माणुस आहे
कारण त्या अंतरवस्त्रांचे वास
मी हुंगत असतो 
तसही त्यांची काहीच 
चूक नाहिये म्हणा
महागडया सुंगधी अत्तर , सेंट
याच्या धुंधीत त्यांना
त्या अंतरवस्त्रातल्या रक्तांचे घामाचे वास कुठुन येतील

लोक म्हणतात
मी खरच वाईट, फालतु,
नालायक, बेअक्ल, बेशरम ,
बावळट, मुर्ख, घाणेरडा आहे
कारण ती अंतरवस्त्रे मी 
स्वतः घालुन बघत असतो 
तसही, आताही त्यांची
काहीच चुक नाहिये म्हणा
कारण अगदी पॉश , टापटीप
कपड़े घालणाऱ्यानी 
कधी स्वताला या फाटक्या
कपड्यात बसवलच नाही
मग त्यांना कस कळणार 
की बलात्कार झालेल्या मला
या फाटक्या, कच-यात पडलेल्या
स्त्रियांच्या कपड्यात रुतुन बसलेल्या
सम्भोगाच्या हवसेने 
किती नागवं केलय ते 



मी आजवर हुंगुन, ते कपड़े घालुन  
नेमक काय शोधत होतो ,  तर
माझ हरवलेल शुद्ध शरीर
इतक होऊनही त्यांना
कधीच कळल नाही की 

बलात्कार हे पुरुषावरही होतात

Comments

Popular posts from this blog

रेगोटया

रेगोटया मारुन मी कधी चित्र नाही काढले मी काढल्या फक्त मनातल्या भावना चित्र आप्सुकच बनत गेले... रगंवण्या चित्र नव्हते रगं मी नुसते रगाचें नाव लिहीत गेलो खोडुन का मिठवाव्या म्हणुन मी चुकाही कागदावरच ठेवत राहीलो बडया चित्रकारांच्या प्रदर्शनाबाहेर मीही माझे चित्र विकाया बसलो ना घेतले कुणीच ते बेरगं चित्र म्हणत मग परतता घरी आधंळयाने ते घेतले विकत                                -  विजय बिळुर                                   ०८ जुलै २०१६

भाकरी

भाकरीच्या तुकड्याचा फक्त प्रश्न होता त्यांनी जातीपातीच्या दंगलीत आमची चुलच जाळली.... जळणाऱ्या पोटाला आन हंबरणार्या ओठाला बघत मग आय बा दोघ बी वाळली.....

म्रुगजळ

पाखरास मिळेना झाड बाधांवया घरटे शोधुन शोधुन दमले बिचारे होई झाडाचें भास नुसते थकुन बिचारे बसले आडोशाला एक पखं वर करुन स्वताच्याच सावलीत....                     विजय बिळुर                     २०१६