तु मी आपण
सारेच बुद्ध आहोत
गरज आहे ती फक्त
डोळे मिठुन शून्यात
नजर गढवण्याची
हजारो टिटव्यांचे
संकटी सुर झेलण्याची ताकद
आहे या बुद्धामधे
फक्त कान आपले असावे
दगडावरती झोपलेला
दगडी बुद्ध निर्जीव नाहीये
त्याच स्मितहास्य त्याचा शांत स्वभाव
त्या दगडातून डोकावतो
आणि तुमच्यातल्या दगडालाही
आकार देऊन क्षणभरासाठी
का होईना बुद्ध जागवतोच ना
तुमच्यातला
बुद्ध समाधीस्थ आहे
त्याची समाधी वेगळी आहे
हजारो दुःखाचे दंश तो
डोळे मिठुन लीलया पेलतो आहे
दंशाची आग आपल्या पोठात गोठवून
ओठांवर गुलाब मोगरे फुलवतो आहे
निळा रंग म्हणजे बुद्ध नव्हे
प्रत्येक रंगातल निळेपण बुद्ध आहे
आईच्या डाव्या काय उजव्या काय
स्थनातल दूध बुद्ध आहे
पाण्यावरचा तरंग बुद्ध आहे
सूर्याची आग बुद्ध आहे
अंधारातला गारवा बुद्ध आहे
नी सप्तसुरातली सुरवात अन शेवट
सा मधे सुद्धा बुद्ध आहे
बुद्ध कळायला हवा प्रत्येकाला
तो कोणत्या रंगाचा नाही
तो कोणत्या कातडीचा नाही
तो प्रत्येक त्या श्वासाचा आहे
जो शांततेच्या शोधात आहे
बुद्ध तुमच्यात माझ्यात आपल्यात
नक्कीच आहे
गरज आहे ती फक्त
आपापल्या देवळांची रचना
बदलण्याची
तुम्हाला तुमच्या देवातही
बुद्ध दिसेल
Comments
Post a Comment