Skip to main content

सवाल ?

जगायचं कस हा प्रत्येक सजीवाला पडलेला एक सवाल ? ज्याचं ऊत्तर शोधता शोधता पेपरची वेळच सपुंन जाते. हा पण कॉपी करुन काहीजण होतात पास तर काहीजण मेहनत करुन. पण आजकाल मेहनत करुन, आभ्यास करुन पेपर लिहणारे " डिबार " म्हणुन घोषित होतात.
              मग काहीजण निराश होऊन पेपर रिकामा सोडुन देतात तर काहीजण शाळाच झाडाला लटकवुन निघुन जातात दुर. पण तरीही जगायचं कसं ? हा सवाल सतवत रहातोच. पास करणारे आणि नापास करणारे दोघेही एकच.
             जगण्याच्या या पेपरमधे तसं पास होणं अवघड नाहीये. पण आजकाल ते खुपच अवघड करुन ठेवलय काही विद्वान मडंळीनीं. तसही केटीचे पैसै मिळावेत हेही कारण असतच की खारीच्या शेपटीएवढं.
            जगणं म्हणजे रिझल्टवर ४ मार्क मिळणं नव्हे किवां जगणं म्हणजे ग्रेस मिळणही नव्हे. मग नेमकं जगणं म्हणजे काय ? हा सुदधा एक सवालच ? एका सवालातुन दुसरा सवाल आणि दुस-या सवालातुन तिसरा सवाल.
           आता पेपर अवघड जाणं यापाठी तो विद्यार्थीच चुकीचा म्हणणं हे खर तर चहावरच्या वाफेनं पाऊस पडला म्हणण्यासारखं आहे. विद्यार्थ्याला पेपर अवघडं जाणं यापाठी त्याचे आई-वडील , शिक्षक , शाळा , शिक्षण मडंळ , पोर्शन , आजुबाजुची लोकं ही सगळी कारणीभुत असतातच की. म्हणुन विद्यार्थ्याने पेपरच रिकामा ठेवणं किवां शाळाच सोडणं नक्कीच चुकीच आहे.
                  मग अशा सवालांवर तोडगा काय तर एकच. सवालाचीं ऊत्तर सापडतील असा सवाल पेपरात असणं. आणि त्या चुकीच्या न सुटणा-या सवालानां आभ्यासक्रमातुन वगळणं.
पोर पासं होणं गरजेच आहे. मग ते भलेही काटावर का असेना.
                 पोराला नापास होण्याची भीती नसते तर भीती असते ती आजुबाजुच्यां लोक़ांची. कारण पेपरमधे मिळालेल्या कमी मार्कापेक्षा समाजात मिळालेली कमी ईज्जत त्या विद्यार्थ्याच्या शाळा सोडण्याला जास्त कारणीभुत असते.
                आता कोणाचं किती ऐकायचं हा सुदधा एक सवालच ?


                                 - विजय बिळुर
                                    ८१४९३५८९७५


Comments

Popular posts from this blog

रेगोटया

रेगोटया मारुन मी कधी चित्र नाही काढले मी काढल्या फक्त मनातल्या भावना चित्र आप्सुकच बनत गेले... रगंवण्या चित्र नव्हते रगं मी नुसते रगाचें नाव लिहीत गेलो खोडुन का मिठवाव्या म्हणुन मी चुकाही कागदावरच ठेवत राहीलो बडया चित्रकारांच्या प्रदर्शनाबाहेर मीही माझे चित्र विकाया बसलो ना घेतले कुणीच ते बेरगं चित्र म्हणत मग परतता घरी आधंळयाने ते घेतले विकत                                -  विजय बिळुर                                   ०८ जुलै २०१६

भाकरी

भाकरीच्या तुकड्याचा फक्त प्रश्न होता त्यांनी जातीपातीच्या दंगलीत आमची चुलच जाळली.... जळणाऱ्या पोटाला आन हंबरणार्या ओठाला बघत मग आय बा दोघ बी वाळली.....

म्रुगजळ

पाखरास मिळेना झाड बाधांवया घरटे शोधुन शोधुन दमले बिचारे होई झाडाचें भास नुसते थकुन बिचारे बसले आडोशाला एक पखं वर करुन स्वताच्याच सावलीत....                     विजय बिळुर                     २०१६