एक पत्र लिव्हायच व्हतं म्हणुन
वाण्याकडणं पेन उधार घेतला
पोस्टमनकडनं टपाल
अन साळतल्या मास्तराकडनं
सबुद ऊधार घेतले
पत्रावर लिव्हलं
मला कोण फुकट विकत घेतय का ?
अन पाठवुन दिलं
परदेशी जाऊन राहीलेल्या
बगळयाच्यां पत्त्यावर
ज्यानां चोच मीच दिली होती फुकटात
ऊत्तर आलं
ईथं काव़ळयानां बदीं आहे.
आलात तर गोळी मारतील.
घरट काय पडणार न्हायी ईतक्यात
तिथच राव्हा
आता मी पोस्टमन वाणी अन
मास्तराकडं जीता हाय
१ रुपयाच्या ऊधारीच्या बदल्यात
आता मात्र दमलो तरी दाखवत नाय
थकलोय तरी थाबंत नाय
बुडातुन निखळलेली चोच
बाधुंन ठेवलीया चुलीसमोरच्या
बायकुच्या पदराच्या फडकयानं
घेतलेली ऊधारी फेडली नायतर
पोरानंवर ओझं पडल
१ रुपयाचं म्हणुन.......
रेगोटया मारुन मी कधी चित्र नाही काढले मी काढल्या फक्त मनातल्या भावना चित्र आप्सुकच बनत गेले... रगंवण्या चित्र नव्हते रगं मी नुसते रगाचें नाव लिहीत गेलो खोडुन का मिठवाव्या म्हणुन मी चुकाही कागदावरच ठेवत राहीलो बडया चित्रकारांच्या प्रदर्शनाबाहेर मीही माझे चित्र विकाया बसलो ना घेतले कुणीच ते बेरगं चित्र म्हणत मग परतता घरी आधंळयाने ते घेतले विकत - विजय बिळुर ०८ जुलै २०१६
Comments
Post a Comment