Skip to main content

ईस्पितळातल्या खाटेवरती तो आडवा
नाकाला ऑक्सिजन
हाता-पायाच्यां
शिरांमधे सलाईनच्या सुया घुसटलेल्या
रक्ताच्यां हजार चाचण्या
कैप्सुलच्या गोळयानी आतडया कडवटलेल्या

जागोजागी पाढं-या पटटयांच बैंडेज
गरज पडली तर म्हणुन रक्त द्यायला नेमकेच
अन खांदा दयायला अख्खा गाव

त्याच झगडणं सुरुच आहे वयक्तीकरित्या
शय्येवरती झोपुन झोपुन पाठ सारी पिचळुन गेलेली
मस्तकावरचे केस जाऊन अनोळोखीपण आलेलं

जागा तीच पण दवाखाना नविन अन वैदयही
खोलीबाहेर तोडं दाबुन रडणारे रडताहेतच
लाल लाईट चालु कधीपासुनची

लहान मुंल घाबरुन जवळच्यानां कवटाळुन
एकीकडे काहीजण देवासमोर हात जोडुन
तर काही हात जोडण्याची हिम्मतही न करणारे

डॉक्टरांचे अतोनात प्रयत्न चालुच
एखादं औषध सांगाव बाहेर येऊन
तर आणायला काही पुढे
फळांची पिशवी घेऊन काहीजण

लाल लाईट बंद
वैदयांसोबत मी ही बाहेर
ओषध आणि फळांची पिशवी घेऊन येणा-याच्यां पिशवीतलं तसच
तेही तसेच स्तब्ध
आप्तेष्ठ माझ्याजवळ येऊन पुकारताहेत नाव माझं
तिकडुन वैदय
त्यानं Resopoance देणं बदं केलय.

आता पुन्हा एकदा नविन चळवळ लढावी लागेल
त्याला परत मिळवायला किमान १५० वर्षाचीं




                              - Vijay bilur


Comments

Popular posts from this blog

रेगोटया

रेगोटया मारुन मी कधी चित्र नाही काढले मी काढल्या फक्त मनातल्या भावना चित्र आप्सुकच बनत गेले... रगंवण्या चित्र नव्हते रगं मी नुसते रगाचें नाव लिहीत गेलो खोडुन का मिठवाव्या म्हणुन मी चुकाही कागदावरच ठेवत राहीलो बडया चित्रकारांच्या प्रदर्शनाबाहेर मीही माझे चित्र विकाया बसलो ना घेतले कुणीच ते बेरगं चित्र म्हणत मग परतता घरी आधंळयाने ते घेतले विकत                                -  विजय बिळुर                                   ०८ जुलै २०१६

भाकरी

भाकरीच्या तुकड्याचा फक्त प्रश्न होता त्यांनी जातीपातीच्या दंगलीत आमची चुलच जाळली.... जळणाऱ्या पोटाला आन हंबरणार्या ओठाला बघत मग आय बा दोघ बी वाळली.....

म्रुगजळ

पाखरास मिळेना झाड बाधांवया घरटे शोधुन शोधुन दमले बिचारे होई झाडाचें भास नुसते थकुन बिचारे बसले आडोशाला एक पखं वर करुन स्वताच्याच सावलीत....                     विजय बिळुर                     २०१६