राडं
रोज कोणीतरी
गरीब स्रींमत गि-हाईक येतो
कंबरेत हात घालुन चिमटे काढत
मला आत ओडुन न्हेतो
अन तासभर भलत्याच सुरात
गाणे गायला लावतो
मग कधी गालावर
कधी कबंरेवर तर कधी
ढुगंणावर फटके ओढुन
आपली घरच्या चुलीत
विझलेली लाकडे ईथे
हक्काने पेटवतो
सुकलेलं शरीर लय
घामाघुम होतं अशावेळी
त्याचं अन माझं बी
तालीम झाली की मग
पडुन रहातो तो तसाच थोडावेळ
मग ऊठतो ब्लाऊजमधल्या
स्तनांजवळ दोनशे तीनशे
हक्काने ठेवतो
अन मग निघुन जातो
शर्टाची दोन तुकडे बटणानी जोडत
ऊंबरठयाबाहेर पडुन
पुन्हा पवित्र होऊन
समाजात वावराय़ला
मी पण ऊबंरठयाबाहेर येते
फाटलेल्या आतड्याचीं गाठ बाधंत
जशी सीमेवरती गोळीबारानीं
तिथली जमिनं पिजुंन
भोक पडुन जावी तशी
पण ऊबंरठयाबाहेर येऊनही
मी मात्र पवित्र होत नाही
समाजात वावरायला
दाराशी ऊभी असलेली पोरं
साडी केस ओठातुन येणारं रक्त
मानेवरल्या पाठीवरल्या
पाळीव सभ्य घुशीचें ओरखडे
पहात रहातात जणु
त्याचीं आई अनोळखीच त्यानां
ते माझ्याकडे बघतात
मी त्याच्यांकडे बघते
कोणीतरी गि-हाईक माझ्या
फाटकया कपडयातल्या
नागव्या शरीराकडे पहात असतो
सगळे शुदध होतात नतंर
सज्जन सभ्य
पण मी मात्र राडंच रहाते
अशी राडं जिच्यात हिम्मत नाही
पोराच्यां नजरेला नजर जुळवण्याची
अन कमवायची गोष्ट विकणं सोडण्याची.....
- vijay bilur
रेगोटया मारुन मी कधी चित्र नाही काढले मी काढल्या फक्त मनातल्या भावना चित्र आप्सुकच बनत गेले... रगंवण्या चित्र नव्हते रगं मी नुसते रगाचें नाव लिहीत गेलो खोडुन का मिठवाव्या म्हणुन मी चुकाही कागदावरच ठेवत राहीलो बडया चित्रकारांच्या प्रदर्शनाबाहेर मीही माझे चित्र विकाया बसलो ना घेतले कुणीच ते बेरगं चित्र म्हणत मग परतता घरी आधंळयाने ते घेतले विकत - विजय बिळुर ०८ जुलै २०१६
Comments
Post a Comment