Skip to main content

खाडाखोड



भर ऊन्हाळयाच्या दिवसात
अचानक पाऊस पडावा
तसं एकेदिवशी अचानक तिच पत्र आलं

वाचायची ऊमेद आणि आशा
माझी अजुनही कमी नव्हती झाली
मी आतुरतेने पत्र ऊघडलं
आणि वरती तीच गोड नाव दिसलं

सावु

त्याफुढे तिचं सासरच आडनाव
फाटलेली गोधडी शिवावी तसं
हसताना फाकलेले ओठ मी आवरले
आणि फुढं वाचु लागलो

डाव्या कोप-यात प्रिय विजु
लिहुन ते खोडलेल होतं
मी म्हटलं असु दे खोडण्यासाठी
तरी का होईना तिनं प्रिय तर
लिहलं होत

पत्रात तसं अजुन फारस काही
लिहलं नव्हतं
नेहमीचच आपलं कसा आहेस
सध्या काय करतोस
पण खालती ऊजव्या कोप-यात
मात्र ब-याच खाडाखोड दिसल्या

तुझी सावु म्हणावं की नुसत सावु
या गोधंळात शेवटी
तिनं पुन्हा परत माझंच नाव लिहलं

आणि मी समजुन गेलो की
तु आणि मी कितीही
दुर असलो तरी अजुनही
एकच आहोत
हाच मजकुर या पत्रातला होता


                          - विजय बिळुर.


Comments

Popular posts from this blog

रेगोटया

रेगोटया मारुन मी कधी चित्र नाही काढले मी काढल्या फक्त मनातल्या भावना चित्र आप्सुकच बनत गेले... रगंवण्या चित्र नव्हते रगं मी नुसते रगाचें नाव लिहीत गेलो खोडुन का मिठवाव्या म्हणुन मी चुकाही कागदावरच ठेवत राहीलो बडया चित्रकारांच्या प्रदर्शनाबाहेर मीही माझे चित्र विकाया बसलो ना घेतले कुणीच ते बेरगं चित्र म्हणत मग परतता घरी आधंळयाने ते घेतले विकत                                -  विजय बिळुर                                   ०८ जुलै २०१६

भाकरी

भाकरीच्या तुकड्याचा फक्त प्रश्न होता त्यांनी जातीपातीच्या दंगलीत आमची चुलच जाळली.... जळणाऱ्या पोटाला आन हंबरणार्या ओठाला बघत मग आय बा दोघ बी वाळली.....

म्रुगजळ

पाखरास मिळेना झाड बाधांवया घरटे शोधुन शोधुन दमले बिचारे होई झाडाचें भास नुसते थकुन बिचारे बसले आडोशाला एक पखं वर करुन स्वताच्याच सावलीत....                     विजय बिळुर                     २०१६