कित्येक ओसाड माळरानावर
झाडं एकटीच उभी आहेत
सांगाडे होऊन....
कधीकाळी पडलेल्या
पावसाचे चार थेंब
अगदी पुरवून पुरवून
जगतायत बिचारी
पुढचा पाऊस पडेपर्यंत....
कुठलीही योजना
नकोय त्यांना त्यांच्या जवळपास
कारण, त्याना पिढीजात
अनुभव आहे की,
अवकाळी पाऊस
काय तो एकदाच मारेल
पण या योजना मात्र
रोज मारतील....
- copyright@vijaybilur.8149....
रत्नागिरी
Comments
Post a Comment