माणसं रोबोट होत चाललीयेत.
प्रत्येक गोष्ट मोजुन मापुन,
तितकीच, तेवढीच, तशीच.....
.माणसं फार कमी विचार
करताहेत एखाद्या गोष्टीचा.
ती फक्त जगतायत मरण येईपर्यंत.....
.इतका कृत्रीमपणा कुठून
आला त्याच्यात
माणसं आतुन कमी पण
दिखाव्यातून खूप व्यक्त होताहेत.....
.कुठेतरी माणसं विसरत
चाललीयेत की समोर पण आपल्यासारखाच दिसणारा
काही अंगावरचे चढ उतार
तेवढे हलकेसे वेगळे असणारा
पण आपल्याच प्रकारात मोडणारा बसणारा आहे कोणीतरी.....
.नाती जोडली जातात पटकन
त्याहून पटकन ती तोडलीही जातायत. जोडण्याचा आनंद तुटल्याचं दुःख क्वचितच होत आणि तेही फार कमी वेळापूरत.....
.माणसं फार विचार करत बसत नाहीयेत. फक्त बोलतात.
फक्त हसतात, फक्त रडतात.
या सगळ्या action मागे तितकी जाणीव किंवा तितकी आत्मीयता,
ओढ असेलच असं नाही.....
.जगणं म्हणजे फक्त आणि
फक्त जगणं होत चाललय.
माणसं आधुनिक होत
निघालीयेत तंत्रज्ञानापेक्षा.....
.त्यांनी नात्यात
आधुनिकता आणलीय.
नेमकं कोणतं सुख हवंय
माणसाला की तो
रोज शोधत रहातो.....
.सुख शोधता यायला
हवंय प्रत्येकाला
थोडतरी सुख असतच
प्रत्येक गोष्टीत.....
.अगदी मरणातही सुख असेलच, दुखातही सुख असतच.
गोड चव कळायला कुठेतरी
तिखट, कडू , आंबट, तुरट या चवी कळलेल्या असतातच.....
.कुठेतरी माणसांनी खरच विचार करायला हवा की आपला विनाश भविष्यात आपण स्वताच करणार आहोत......
.निसर्ग फक्त आपल्याला
कुजवण्याचं काम करेल त्याच्या कामाशी प्रामाणिक राहून......
Comments
Post a Comment