Skip to main content

एक पान मागे राहीलय
फादींवर तग धरुन हटटाने
सगळी पाने केव्हाची झडलीत तरी

त्याला अजुनही वाटतय
या फादींवर घरटं बाधंलेलं पाखरु
जे ऊडुन गेलय ते परत येईल

ते आता पिकायला तयारच नाही
ते झाडाशी रुसुन बसलय
आणि गळुुन पडलेल्या पानावर
राग धरुन

त्याला जगात खोटीही असतात पाखरं
आणि त्याचं घरटं बाधण्यापुरतच प्रेम
हे ऊमगतच नाहीए
किबंहुना त्याला ऊमगुन घ्यायचच नाही

अशी वेडीपीशी झालेली पानं
गळुन पडतातच नियमाप्रमाणे
सुकतात तुकडे होतात

त्यातलाच एक ईवलासा तुकडा
चोचीत धरुन एखादं नवं चिटपाखरु
घेऊन जातं आपलं घरटं बाधांयला

अन हे येडं राजकारण विसरुन
पुन्हा पडायला लागतं प्रेमात
आताही त्याला कळत नाहीए
की त्याचं प्रेम जन्माला घालण्यासाठी
याचा वापर करताहेत

ते पुन्हा हिरवं बनायचा
प्रयत्न करतय

अशा निरागस पानांच
आणि त्या मौसमी पाखराचं काय करांव ?


Comments

Popular posts from this blog

रेगोटया

रेगोटया मारुन मी कधी चित्र नाही काढले मी काढल्या फक्त मनातल्या भावना चित्र आप्सुकच बनत गेले... रगंवण्या चित्र नव्हते रगं मी नुसते रगाचें नाव लिहीत गेलो खोडुन का मिठवाव्या म्हणुन मी चुकाही कागदावरच ठेवत राहीलो बडया चित्रकारांच्या प्रदर्शनाबाहेर मीही माझे चित्र विकाया बसलो ना घेतले कुणीच ते बेरगं चित्र म्हणत मग परतता घरी आधंळयाने ते घेतले विकत                                -  विजय बिळुर                                   ०८ जुलै २०१६

भाकरी

भाकरीच्या तुकड्याचा फक्त प्रश्न होता त्यांनी जातीपातीच्या दंगलीत आमची चुलच जाळली.... जळणाऱ्या पोटाला आन हंबरणार्या ओठाला बघत मग आय बा दोघ बी वाळली.....

म्रुगजळ

पाखरास मिळेना झाड बाधांवया घरटे शोधुन शोधुन दमले बिचारे होई झाडाचें भास नुसते थकुन बिचारे बसले आडोशाला एक पखं वर करुन स्वताच्याच सावलीत....                     विजय बिळुर                     २०१६