बाबा तुमच पार्थीव
घरी आणलं
१८ भोक होती
तुमच्या छाताडावर
आज दिवाळीत
पोर हातात बदुंक घेऊन
चोर पोलिस खेळत होतीत
चोर ८ आणि पोलीस ३
एक डाव झाला की
पोलिस चोर व्हायचे अन
चोर पाढंरपेशी
बाबा पोरं खेळ खेळत होतीत
की तुमचा खेळ झाला
ते तेवढं कळलं नाही
१८ भोकं फक्त
घेऊन आलात शौर्यपदक
म्हणुन मिरवत
एखादी खरीखुरी बदुंक
आणली असतीत तर.....
घरी आणलं
१८ भोक होती
तुमच्या छाताडावर
आज दिवाळीत
पोर हातात बदुंक घेऊन
चोर पोलिस खेळत होतीत
चोर ८ आणि पोलीस ३
एक डाव झाला की
पोलिस चोर व्हायचे अन
चोर पाढंरपेशी
बाबा पोरं खेळ खेळत होतीत
की तुमचा खेळ झाला
ते तेवढं कळलं नाही
१८ भोकं फक्त
घेऊन आलात शौर्यपदक
म्हणुन मिरवत
एखादी खरीखुरी बदुंक
आणली असतीत तर.....
Comments
Post a Comment