Skip to main content

.

ऊशाला असते तुझी सोबत
मी गातो आठवणीतली गाणी
गर्दकाळे नाचता मेघ मग
गळते छप्परातुन पाणी....

वाटते पुन्हा एकदा शेंदावे घर
पण तसेच वाहु देतो
जाईल पाऊस एकदाचा म्हणता
पुन्हा परत तो परतुनी येतो....

चार महीन्यांचा पावसाळा हा
बारमाही होऊन गेला
तु गेल्यानंतर पुन्हा एकदा
छप्पर लागले गळाया.....




                      - विजय बिळुर
                         खाडाखोड


Comments

Popular posts from this blog

रेगोटया

रेगोटया मारुन मी कधी चित्र नाही काढले मी काढल्या फक्त मनातल्या भावना चित्र आप्सुकच बनत गेले... रगंवण्या चित्र नव्हते रगं मी नुसते रगाचें नाव लिहीत गेलो खोडुन का मिठवाव्या म्हणुन मी चुकाही कागदावरच ठेवत राहीलो बडया चित्रकारांच्या प्रदर्शनाबाहेर मीही माझे चित्र विकाया बसलो ना घेतले कुणीच ते बेरगं चित्र म्हणत मग परतता घरी आधंळयाने ते घेतले विकत                                -  विजय बिळुर                                   ०८ जुलै २०१६

भाकरी

भाकरीच्या तुकड्याचा फक्त प्रश्न होता त्यांनी जातीपातीच्या दंगलीत आमची चुलच जाळली.... जळणाऱ्या पोटाला आन हंबरणार्या ओठाला बघत मग आय बा दोघ बी वाळली.....

म्रुगजळ

पाखरास मिळेना झाड बाधांवया घरटे शोधुन शोधुन दमले बिचारे होई झाडाचें भास नुसते थकुन बिचारे बसले आडोशाला एक पखं वर करुन स्वताच्याच सावलीत....                     विजय बिळुर                     २०१६