Skip to main content

नुसतच


इतका बढा लेखक असूनही
तो माझ्यासारख्या गरिबा सोबत
नवा कोट, नवी बूट, नवीन चेष्मा
मी मात्र भिजत पडलेल्या गटारातल्या
एखाद्या गोणपाटा सारखा
रोज थोडा थोडा शेवाळत चाललेला
झिझत चाललेला की उसवत की
माझ्याच धाग्यापासून तुटत चाललेला मी

काही असो
तो मात्र रोज यायचा भेटायचा, बोलायचा
बरं वाटायचं
लोकांना पण माहिती पडली होती आमची मैत्री
ते पण म्हणायचे
ईतना बढा लेखक होकर भी
कभी जमीनसे पैर नही उठे उनके
मला परत बरं वाटायचं
त्याची निस्वार्थ मैत्री बघून

कधी काही मागायचा नाही
की कधी काही स्वतः पण द्यायचा नाही
नुसताच यायचा, बसायचा, बोलायचा
आणि निघून जायचा नुसताच

तो नाही आपण तरी द्यावं त्याला
काहीतरी म्हणुन पैसे साठवून साठवून
एक वस्तु घेतलीं आणि
दिली त्याला एकेदिवशी अचानक
त्याच्या बुटा इतक्याच चमकणाऱ्या कागदातून

त्याने खोलून बघितलं
पुस्तक होत आतमधे
ते पुस्तक तसच माझ्याजवळ ठेवत
तो काहीच न बोलता निघून गेला
त्यानंतर तो कधीच आला नाही
परत माझ्याकडे
बोलायला, बसायला
किंवा असच नुसतच

नंतर कळलं एकेदिवशी
तो नुसताच यायचा पण
नुसताच जायचा मात्र नाही
माझीच सगळी दुःख त्याने
छापली होती पुस्तकात
मला कधीच न सांगता

मला मात्र वाटत होतं
निस्वार्थी आहे तो
नुसताच येतो,
नुसताच जातो

Comments

Popular posts from this blog

रेगोटया

रेगोटया मारुन मी कधी चित्र नाही काढले मी काढल्या फक्त मनातल्या भावना चित्र आप्सुकच बनत गेले... रगंवण्या चित्र नव्हते रगं मी नुसते रगाचें नाव लिहीत गेलो खोडुन का मिठवाव्या म्हणुन मी चुकाही कागदावरच ठेवत राहीलो बडया चित्रकारांच्या प्रदर्शनाबाहेर मीही माझे चित्र विकाया बसलो ना घेतले कुणीच ते बेरगं चित्र म्हणत मग परतता घरी आधंळयाने ते घेतले विकत                                -  विजय बिळुर                                   ०८ जुलै २०१६

भाकरी

भाकरीच्या तुकड्याचा फक्त प्रश्न होता त्यांनी जातीपातीच्या दंगलीत आमची चुलच जाळली.... जळणाऱ्या पोटाला आन हंबरणार्या ओठाला बघत मग आय बा दोघ बी वाळली.....

म्रुगजळ

पाखरास मिळेना झाड बाधांवया घरटे शोधुन शोधुन दमले बिचारे होई झाडाचें भास नुसते थकुन बिचारे बसले आडोशाला एक पखं वर करुन स्वताच्याच सावलीत....                     विजय बिळुर                     २०१६