तुला आठवतंय
पावसाळा आला की
आपण कागदांची होडी करायचो
आणि एखाद्या
आपल्या एवढ्या
ओहळीत सोडून द्यायचो
दरवेळी माझीच
होडी पुढे जायची
आता मोठे झालोयत आपण
पाऊसही पडतो
तु कुठे नसतेस
तुझी होडीही कुठे
दिसत नाही
माझी होडी पुढे नाही जात कधी
आणि प्रयत्न करूनही गेली नाही
शाळा संपल्यापासून
कुणीतरी माग रहाणार असलं
तरच आपण पुढे जाऊ शकतो ना गं ?
Comments
Post a Comment