Skip to main content

नोंद

खूप मनापासून वाटतं
एखादा मोठा गुन्हा करावा
कोर्टाने फाशीची शिक्षा सूनवावी
आणि विचारावं तुझी शेवटची ईच्छा काय ?
गेल्या कित्येक पिढ्या न पिढ्या
आमची नोंद कुठेच केली गेली नाही
आणि तुमची ईच्छा काय म्हणून
कधी विचारलंही नाही कुणी

निदान या निमित्ताने का होईना
कुठल्या तरी सरकारी कागदामध्ये
आमची नोंद तरी राहील आणि
कुणीतरी आम्हाला मरण्याआधी
तरी का होईना विचारपूस केली
तुम्हाला काय हवंय म्हणून
याचा आनंद तरी होईल

Comments

Popular posts from this blog

रेगोटया

रेगोटया मारुन मी कधी चित्र नाही काढले मी काढल्या फक्त मनातल्या भावना चित्र आप्सुकच बनत गेले... रगंवण्या चित्र नव्हते रगं मी नुसते रगाचें नाव लिहीत गेलो खोडुन का मिठवाव्या म्हणुन मी चुकाही कागदावरच ठेवत राहीलो बडया चित्रकारांच्या प्रदर्शनाबाहेर मीही माझे चित्र विकाया बसलो ना घेतले कुणीच ते बेरगं चित्र म्हणत मग परतता घरी आधंळयाने ते घेतले विकत                                -  विजय बिळुर                                   ०८ जुलै २०१६

भाकरी

भाकरीच्या तुकड्याचा फक्त प्रश्न होता त्यांनी जातीपातीच्या दंगलीत आमची चुलच जाळली.... जळणाऱ्या पोटाला आन हंबरणार्या ओठाला बघत मग आय बा दोघ बी वाळली.....

म्रुगजळ

पाखरास मिळेना झाड बाधांवया घरटे शोधुन शोधुन दमले बिचारे होई झाडाचें भास नुसते थकुन बिचारे बसले आडोशाला एक पखं वर करुन स्वताच्याच सावलीत....                     विजय बिळुर                     २०१६