Skip to main content

पावसाळा

पावसाळा सुरू झाला
की मी खिडक्या, दारं
व्हाट्सप, फेसबुक
TV, tape
वर्तमान पत्र, मासिकं
सगळं सगळं बंद करतो मी

पावसाळ्यात
आठवण काढायला प्रत्येकाकडे
प्रेयसी असतेच असं नसत ना

सगळी बाग फुलुन आल्यावर
काहीच सुकत नसतं कुठेही
असही नसतं ना

मग कशाला उगाच
दारं- खिडक्यात बसून
व्हाट्सप, फेसबुक मधून
Tv, tape
वर्तमान पत्र, मासिकं
यातुन आपण सिंगल
असल्याचं स्वताला जाणवु द्यायचं

एका वेळी
एकच पाऊस पडलेला
बरा म्हणतो मी

Comments

Popular posts from this blog

रेगोटया

रेगोटया मारुन मी कधी चित्र नाही काढले मी काढल्या फक्त मनातल्या भावना चित्र आप्सुकच बनत गेले... रगंवण्या चित्र नव्हते रगं मी नुसते रगाचें नाव लिहीत गेलो खोडुन का मिठवाव्या म्हणुन मी चुकाही कागदावरच ठेवत राहीलो बडया चित्रकारांच्या प्रदर्शनाबाहेर मीही माझे चित्र विकाया बसलो ना घेतले कुणीच ते बेरगं चित्र म्हणत मग परतता घरी आधंळयाने ते घेतले विकत                                -  विजय बिळुर                                   ०८ जुलै २०१६

भाकरी

भाकरीच्या तुकड्याचा फक्त प्रश्न होता त्यांनी जातीपातीच्या दंगलीत आमची चुलच जाळली.... जळणाऱ्या पोटाला आन हंबरणार्या ओठाला बघत मग आय बा दोघ बी वाळली.....

म्रुगजळ

पाखरास मिळेना झाड बाधांवया घरटे शोधुन शोधुन दमले बिचारे होई झाडाचें भास नुसते थकुन बिचारे बसले आडोशाला एक पखं वर करुन स्वताच्याच सावलीत....                     विजय बिळुर                     २०१६