तुझी आठवण येता
तुला पत्र लिहावे वाटते
लिहील्या हजार पत्रानां
तुझे एकही ऊत्तर नसते
वर्षामागे वर्षे ऊलटली
तरी त्याच पत्त्यावर पत्र पाठवते
ऊत्तर नको काही तुझे
निदान फाडुन माझेच पत्र तु
मलाच पाठवावे ईतकेच वाटते
कळुन चुकले मला
तुझा पत्ता तो बदलला
पोहचत नाहीत पत्रे माझी तुला
माहीत आहे मला
कोणाचेच पत्र त्या पत्त्यावर पोहचत नाही
तरी लिहते पत्र कारण
कधीतरी पोहचेल
नाहीच पोहचले तर मग
मी माझाच पत्ता बदलेन
अन येईन तुझ्याच पत्त्यावर
ना पत्राची गरज असेल ना
ना आणखी कशाची
तुझ्याशी बोलायला लागेल
ती फक्त चिमुटभर माती.....
विजय बिळुर
१६-०७-२०१६
रेगोटया मारुन मी कधी चित्र नाही काढले मी काढल्या फक्त मनातल्या भावना चित्र आप्सुकच बनत गेले... रगंवण्या चित्र नव्हते रगं मी नुसते रगाचें नाव लिहीत गेलो खोडुन का मिठवाव्या म्हणुन मी चुकाही कागदावरच ठेवत राहीलो बडया चित्रकारांच्या प्रदर्शनाबाहेर मीही माझे चित्र विकाया बसलो ना घेतले कुणीच ते बेरगं चित्र म्हणत मग परतता घरी आधंळयाने ते घेतले विकत - विजय बिळुर ०८ जुलै २०१६
Comments
Post a Comment