Skip to main content

देव चोरला.

हे देवा तुझी लेकरं ऊपाशी रं
पोट बघ त्याचं आत किती गेलय रं
नुसता दगड बनुन काय राहीला
कवातरी माती बनुन रोप ऊगव रं.....

पोटं रिकामं गुडुगडु वाजतया
कापड बी अगांवरच फडफडतया
नशीबाचा वाळवटं सरना झाला
बाभळीगत माणुस जिता सुकला.....

पाऊस हयो धो धो पडुन राहीला
डोळयातल्या आभाळानं खिसा भरला
रगात माझं साडलं रं जणु भडांरा
एकलाच दिवा लढती विरुदध अधांरा

हाय जीव तोवर माथा टेकीन
सपंला खेळ तर तुजपाशी येईन
रखरखता सुर्य हो वैरी कवा झाला
काळजातल्या दुधाचा झरा आटला

शेबुडं ओडत पोर देवा तुझ्या दारी येई
खडीसाखरबी मिळण्या बड्या मुश्कीली
चपला हया चोरल्या न्हायी कुणी रं
देवळातला तो देवच चोरला रं......


                     - विजय बिळुर.


Comments

Popular posts from this blog

रेगोटया

रेगोटया मारुन मी कधी चित्र नाही काढले मी काढल्या फक्त मनातल्या भावना चित्र आप्सुकच बनत गेले... रगंवण्या चित्र नव्हते रगं मी नुसते रगाचें नाव लिहीत गेलो खोडुन का मिठवाव्या म्हणुन मी चुकाही कागदावरच ठेवत राहीलो बडया चित्रकारांच्या प्रदर्शनाबाहेर मीही माझे चित्र विकाया बसलो ना घेतले कुणीच ते बेरगं चित्र म्हणत मग परतता घरी आधंळयाने ते घेतले विकत                                -  विजय बिळुर                                   ०८ जुलै २०१६

भाकरी

भाकरीच्या तुकड्याचा फक्त प्रश्न होता त्यांनी जातीपातीच्या दंगलीत आमची चुलच जाळली.... जळणाऱ्या पोटाला आन हंबरणार्या ओठाला बघत मग आय बा दोघ बी वाळली.....

म्रुगजळ

पाखरास मिळेना झाड बाधांवया घरटे शोधुन शोधुन दमले बिचारे होई झाडाचें भास नुसते थकुन बिचारे बसले आडोशाला एक पखं वर करुन स्वताच्याच सावलीत....                     विजय बिळुर                     २०१६