" बा "
नं फास लावुन घेतला कर्जापायी अन
घरात खाया कायबी नाय म्हणुन
सरकार आलं दारात
सहानुभुती दाखवायला
आयनं परत थोडं कर्ज घेतलं
त्येस्नी चहापाणी कराया
जाताना सरकार रगेबेंरगी
फुल देऊन गेलीत
पाण्याईना सुकलेल्या बाभळीला
आयनं ते घेतलं
बाच्या फोटुपाशी ठेवलं
पोरास्नी डोळं मिठुन
हात जोडाया लावुन म्हणाली
१००-१५० ची फुलं आणण्याऐवजी
एक दोन किलो तादुंळ आणलं असतं
तर चार दिवस जादा जगलु असतु
ऊदया यातलं अजुन येक जाईल
ऊपासमारानं
सरकार परत येईल फुल घेऊन
ऊदया मीच गेली तर
पोरं फुल खातील
परवा तेरवा ती पण
येतील मागुन आपल्या
आन म्हणतील तुला
बा भुक लागलीया खाया दे ना कायतरी
तवा काय करायच आपुण
मरुबी शकत नाय तवा त्येस्नी
टाळायचं म्हटलं तर
मेलयावर अजुन काय मरणार
रेगोटया मारुन मी कधी चित्र नाही काढले मी काढल्या फक्त मनातल्या भावना चित्र आप्सुकच बनत गेले... रगंवण्या चित्र नव्हते रगं मी नुसते रगाचें नाव लिहीत गेलो खोडुन का मिठवाव्या म्हणुन मी चुकाही कागदावरच ठेवत राहीलो बडया चित्रकारांच्या प्रदर्शनाबाहेर मीही माझे चित्र विकाया बसलो ना घेतले कुणीच ते बेरगं चित्र म्हणत मग परतता घरी आधंळयाने ते घेतले विकत - विजय बिळुर ०८ जुलै २०१६
Comments
Post a Comment