Skip to main content

कोणाचं दुखं मोठं ?

कोणाचा तवा
नुसताच जळतोय चुलीवर
भाकरीविना
कोणाची भाकर हातातच पडुन
तव्याविना
कोणाला घासच नाही
भाकर तवा असुन
हाताविना
कोणाचं दुखं मोठ ?
जळणा-या तव्याच
हातावरच्या भाकरीचं
की हात नसल्याचं
ऊत्तर सापडलं ते
स्मशानापाशी
मला जाळताना शिंपडायला
आणलेलं तुप जेव्हा
कोणीतरी माझ्या सरणावर कमी
अन स्वताच्या अगांवर
जास्त साडुंन घेत होतं
नंतर कापडं पिळुन भांडयात
तुप काढुन घेता येईल म्हणुन
तेव्हा कळलं
कोणाचं दुखं मोठं तर
रिकाम्या प्रत्येक पोटाचं........


Comments

Popular posts from this blog

रेगोटया

रेगोटया मारुन मी कधी चित्र नाही काढले मी काढल्या फक्त मनातल्या भावना चित्र आप्सुकच बनत गेले... रगंवण्या चित्र नव्हते रगं मी नुसते रगाचें नाव लिहीत गेलो खोडुन का मिठवाव्या म्हणुन मी चुकाही कागदावरच ठेवत राहीलो बडया चित्रकारांच्या प्रदर्शनाबाहेर मीही माझे चित्र विकाया बसलो ना घेतले कुणीच ते बेरगं चित्र म्हणत मग परतता घरी आधंळयाने ते घेतले विकत                                -  विजय बिळुर                                   ०८ जुलै २०१६

भाकरी

भाकरीच्या तुकड्याचा फक्त प्रश्न होता त्यांनी जातीपातीच्या दंगलीत आमची चुलच जाळली.... जळणाऱ्या पोटाला आन हंबरणार्या ओठाला बघत मग आय बा दोघ बी वाळली.....

म्रुगजळ

पाखरास मिळेना झाड बाधांवया घरटे शोधुन शोधुन दमले बिचारे होई झाडाचें भास नुसते थकुन बिचारे बसले आडोशाला एक पखं वर करुन स्वताच्याच सावलीत....                     विजय बिळुर                     २०१६