आपलं मन गुंतलय या जगात. रोज आपण ऊदयाही जिंवतच आहोत याच विचारानं जगतोय. कधी विचार केलायत का जर अचानक ऊदया मेलो तर...
काय होईल. लोक चार दिवस रडतील घरचे १३ दिवर फार फार तर महीनाभर. पण पुढे काय मरणा-यामुळे कोणाच अडलय का ? काही थांबलय का. माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे असं जे काही आपण म्हणतो ते फक्त जिंवत असेपर्यन्तच का ? रोज कसं जगतोय आपण ? कुठल्या विचारात ? किती गोष्टींचा विचार करणं राहुन जातय ? जे जगतोय त्यापलीकडेही बरच काही आहे. त्याच काय?
• सुख म्हणजे काय ?
• संभोग म्हणजे सुख का ?
• लग्न कशासाठी ?
• आपण एकटं राहु शकत नाही का ?
वेश्या नसुनही काही मुली सहज तिच्या
प्रियकराशी सेक्स करतात तो लग्न करील नाही
करील काही गैरंटी नसताना. हा असा सेक्स
कशासाठी ?
• बरं आपल्याला मिळणारी बायको कोणाशी
शारीरीक संबध नसलेली असेल का ?
• ती असली आणि आपण नसलो तर ?
• शिक्षण कितीस ऊपयोगी आहे ?
• पास व्हायलाच हवं का ?
• नापास झालोतर काय बिघडेल ?
• पास झालेली खरच हुशार असतात का ?
• अडाणी माणुस खुप चांगल आयुष्य जगु
शकत नाही का ?
• गरीब लोक का आहेत ?
• एकाकडे जास्त पैसा एकाकडे कमी अस का
आणि कधीपासुन ,कसं झालय हे ?
• देव आहे का ?
• आहेतर दिसत का नाही ?
• कोणीच पुण्यवान नाही का ?
• जर देवाला बघण्यासाठी एवढा आटापिटा
करावा लागत असेल तर देव कशासाठी हवाय
?
• मेलेले कुठे गेले ?
• आत्मा बित्मा खरच असतं का ?
• हे शरीर काय आहे नेमक ?
• माणसाची निर्मीती का झाली ?
• जात-पात आपण का निर्माण केले ?
• जाती - पाती नसाव्यात अस मत असुन का
त्या संपवत नाहीत आपण ?
• रोजची धावपळ कशासाठी ?
• आपण खोटारडे पणाने का जगतोय ?
• रात्र दिवस का होतात कशासाठी ?
• हे नातीगोती काय आहे ?
• मला मरता येईल कधीही पण जगायच असेल
तर ?
• म्हातारपण म्हणजे काय ?
• म्हातारपण का येत ?
• देवळात पुजारी खरच देवाच्या सेवेसाठी काम
करतो का ?
• स्त्रींया पुरुषांवर बलात्कार करत नसतींल
का ?
• महागाई खरच वाढतेय की वाढवली जातेय
?
• असे अजुन किती सवाल ?
Copyright@vijaybilur8149.....
रेगोटया मारुन मी कधी चित्र नाही काढले मी काढल्या फक्त मनातल्या भावना चित्र आप्सुकच बनत गेले... रगंवण्या चित्र नव्हते रगं मी नुसते रगाचें नाव लिहीत गेलो खोडुन का मिठवाव्या म्हणुन मी चुकाही कागदावरच ठेवत राहीलो बडया चित्रकारांच्या प्रदर्शनाबाहेर मीही माझे चित्र विकाया बसलो ना घेतले कुणीच ते बेरगं चित्र म्हणत मग परतता घरी आधंळयाने ते घेतले विकत - विजय बिळुर ०८ जुलै २०१६
Comments
Post a Comment