Skip to main content

टिटवी

एक टिटवी
रोज दाराशी येऊन रडायची
भयान सुरात

मी म्हंटलं आता अजुन
माझ्याकडच घेऊन जाण्यासारखं
काय ऊरलय गं
की तु आजही दाराशी येऊन
भयान सुरात रडतेयस

बा ला घेऊन गेलीस
पाठोपाठ आयपण गेली
परवा परवा तर बायकोपण
पोटातल्या पोरासकट गेली

आता माझ्यासाठी आली असशील
तर मलाही घेऊन चल
मलाही नाही रहावत आहे आता
दिंवसांच्या या ऊजेडात डोळे जळताहेत
अन रात्रीच्या या अंधारात गोठताहेत

मी दोन्ही हात पसरवुन
डोळे मिठुन आभाळाकडे मान वर करुन
ऊभा राहीलो मलाही घेऊन चल

टिटवी म्हणाली
या घरातलं कुणीच जाऊ नये
असं वाटायचं मलापण म्हणुन
मी हा गावच सोडुन दुसरीकडे गेले होते
का तर माझ्या रडण्यानं
कुणी जाऊ नये म्हणुन

पण कुणीतरी गेल्याची
खबर यायची कानावर
अन दरवेळी मी येऊन दाराशी रडायची
ते गेल्याच्या दु:खात

तुला वाटायचं मी रडतेय
म्हणुन जातंय कुणीतरी
या येळला मात्र तु जायच्या आधी
आलेय मी तुझ्या दाराशी
कारण माझ्या दारात येऊन
कोणतीही टिटवी रडली नव्हती
तरी सगळे गेले
मीही ब-याच वर्षापासुन एकटीच रे

मलाही नाही रहावत आहे आता
दिवसांच्या या ऊजेडात डोळे जळतात
अन रात्रीच्या अंधारात गोठताहेत
या येळला मी जाते बाबा, तु नको
म्हणुन आज ईथं दाराशी
तुझ्या जाण्याआधी मी हजर

हां पण यावेळी माझं रडणं
माझ्यांनंतर तु पण जाणार एकदिस म्हणुन
पण त्या रडण्यात अन या रडण्यात
लय फरक बघ

काही चुकलं असलं तर माफ कर
पखं मिटतेय तुझ्यासमोर
अखेरच......

Comments

Popular posts from this blog

रेगोटया

रेगोटया मारुन मी कधी चित्र नाही काढले मी काढल्या फक्त मनातल्या भावना चित्र आप्सुकच बनत गेले... रगंवण्या चित्र नव्हते रगं मी नुसते रगाचें नाव लिहीत गेलो खोडुन का मिठवाव्या म्हणुन मी चुकाही कागदावरच ठेवत राहीलो बडया चित्रकारांच्या प्रदर्शनाबाहेर मीही माझे चित्र विकाया बसलो ना घेतले कुणीच ते बेरगं चित्र म्हणत मग परतता घरी आधंळयाने ते घेतले विकत                                -  विजय बिळुर                                   ०८ जुलै २०१६

भाकरी

भाकरीच्या तुकड्याचा फक्त प्रश्न होता त्यांनी जातीपातीच्या दंगलीत आमची चुलच जाळली.... जळणाऱ्या पोटाला आन हंबरणार्या ओठाला बघत मग आय बा दोघ बी वाळली.....

म्रुगजळ

पाखरास मिळेना झाड बाधांवया घरटे शोधुन शोधुन दमले बिचारे होई झाडाचें भास नुसते थकुन बिचारे बसले आडोशाला एक पखं वर करुन स्वताच्याच सावलीत....                     विजय बिळुर                     २०१६