Skip to main content

आकार

आपण भुताबितानां कधीच घाबरलो नसतो जर माणसानीं त्याचं चित्र आपल्या डोळयासमोर ऊभं केल नसतं तर. लहान मुलं तिकडं भु आहे जाऊ नको म्हटलं तरी पळतात. माहीतच नसतं तयानां भुत कसं दिसतं, काय असतं नेमकं.
              भुताला आपण जन्माला घातलं. काय तर पाय ऊलटे असतात. पांढरे कपडे असतात. लेडीझ असेल तर केसं सोडलेली. नखं वाढवलेली. मान ऊलटी. हे सगळं चित्राच्यां मग ते स्थिर असो वा हलते. तयार केलं गेलं. त्याला आकार दिला गेला आणि मग लोकं घाबरायला लागले. ते पण कशाला नेमकं तर अधांराला. अंधारातुन येईल भुत. मग कोणतं येईल तर त्यानीं जी आक्रुती बघितली असेल भुताची ती.

देवाच्या बाबतीतही असच आहे. आकारच जन्माला घातला नसता माणसाने तर कुठला देव आणि कुठलं काय. ना मदींर , ना पुजारी, ना दक्षिणा, ना प्रसाद.....
माणुस आकाराला घाबरतो. विशिषठ प्रकारचा आकार त्याची भीती वाढवत असते. 

ऊदाहरणार्थ - साप. लांबलचक असतो वळवळणारा म्हणुन लोक घाबरुन पळ काढतात. तोच जर साप सस्यासारखा, मांजरासारखा असता तर कोण घाबरलं असतं का. आकार, रगंरुप खुप परीणामकारक ठरत असतो आपल्या मनावर. सुंदर मुलगी लगेच मनात भरते. पण काळी सावळी तितकीशी नाही.

तात्पर्य - आकार निर्माण झाला की भावना ही जन्माला येते.


Comments

Popular posts from this blog

रेगोटया

रेगोटया मारुन मी कधी चित्र नाही काढले मी काढल्या फक्त मनातल्या भावना चित्र आप्सुकच बनत गेले... रगंवण्या चित्र नव्हते रगं मी नुसते रगाचें नाव लिहीत गेलो खोडुन का मिठवाव्या म्हणुन मी चुकाही कागदावरच ठेवत राहीलो बडया चित्रकारांच्या प्रदर्शनाबाहेर मीही माझे चित्र विकाया बसलो ना घेतले कुणीच ते बेरगं चित्र म्हणत मग परतता घरी आधंळयाने ते घेतले विकत                                -  विजय बिळुर                                   ०८ जुलै २०१६

भाकरी

भाकरीच्या तुकड्याचा फक्त प्रश्न होता त्यांनी जातीपातीच्या दंगलीत आमची चुलच जाळली.... जळणाऱ्या पोटाला आन हंबरणार्या ओठाला बघत मग आय बा दोघ बी वाळली.....

म्रुगजळ

पाखरास मिळेना झाड बाधांवया घरटे शोधुन शोधुन दमले बिचारे होई झाडाचें भास नुसते थकुन बिचारे बसले आडोशाला एक पखं वर करुन स्वताच्याच सावलीत....                     विजय बिळुर                     २०१६