तु हस ना जराशी
आज माझी जत्रा आहे
तिरडीवरती माझ्या
तुझ्या अंगणातले फुल आहे
बघ किती भंडारा
उधळलाय लोकांनी
एरवी जखमेला हळदही
नव्हतं कुणाकडे
आलेली गर्दी खुश आहे
तर मग तु एकटी उदास का ?
कपाळावरची टिकली पडल्याचे
इतके खरे नाटक का ?
बघ बाई माझी जत्रा अशी
दुरुन बघण्यात घालवु नकोस
अंगात आलाय अस दाखुवुन
रडून घे केसाआड
तिरडी उचलल्यावर चुकुनही
टाहो फोडु नकोस
मी लागलोय आता संसाराला
तुझं लग्न होणं अजुन बाकी आहे
आज माझी जत्रा आहे
तिरडीवरती माझ्या
तुझ्या अंगणातले फुल आहे
बघ किती भंडारा
उधळलाय लोकांनी
एरवी जखमेला हळदही
नव्हतं कुणाकडे
आलेली गर्दी खुश आहे
तर मग तु एकटी उदास का ?
कपाळावरची टिकली पडल्याचे
इतके खरे नाटक का ?
बघ बाई माझी जत्रा अशी
दुरुन बघण्यात घालवु नकोस
अंगात आलाय अस दाखुवुन
रडून घे केसाआड
तिरडी उचलल्यावर चुकुनही
टाहो फोडु नकोस
मी लागलोय आता संसाराला
तुझं लग्न होणं अजुन बाकी आहे
Comments
Post a Comment