Skip to main content
एक समुद्र आहे मनात
लाटा नाहीत
फेस नाही
मासे, मोती, झाडे
काही काही नाहिये आतमधे
नुसताच समुद्र.. 
अस ऐकल होत
समुद्रकिनारी भुत असतात
किनारा सापडला नसेल 
भूतानां अजुन कदाचित...

ना कधी भरतींन उधाण आलय
ना कधी ओहोटी 
कसलच कुणाकडुन
गुरुत्वाकर्षण नाही न म्हणुन 
असेल कदाचित...

कधी बाष्पीभवन पण होत नाही
सपुंन जायच म्हंटलं तर 
अन कधी झिरपतही नाही 
आतल्या आत
आटुन जायचं म्हंटलं तर 
अमर असेल मग भीष्मासारखं
कदाचीत......

पण त्याला
इच्छामरणाच वरदान तरी होतं 
हया समुद्रांन कुठवर अस
रहायच पडुन काखेतल्या केसासारखं





Comments

Popular posts from this blog

रेगोटया

रेगोटया मारुन मी कधी चित्र नाही काढले मी काढल्या फक्त मनातल्या भावना चित्र आप्सुकच बनत गेले... रगंवण्या चित्र नव्हते रगं मी नुसते रगाचें नाव लिहीत गेलो खोडुन का मिठवाव्या म्हणुन मी चुकाही कागदावरच ठेवत राहीलो बडया चित्रकारांच्या प्रदर्शनाबाहेर मीही माझे चित्र विकाया बसलो ना घेतले कुणीच ते बेरगं चित्र म्हणत मग परतता घरी आधंळयाने ते घेतले विकत                                -  विजय बिळुर                                   ०८ जुलै २०१६

भाकरी

भाकरीच्या तुकड्याचा फक्त प्रश्न होता त्यांनी जातीपातीच्या दंगलीत आमची चुलच जाळली.... जळणाऱ्या पोटाला आन हंबरणार्या ओठाला बघत मग आय बा दोघ बी वाळली.....

म्रुगजळ

पाखरास मिळेना झाड बाधांवया घरटे शोधुन शोधुन दमले बिचारे होई झाडाचें भास नुसते थकुन बिचारे बसले आडोशाला एक पखं वर करुन स्वताच्याच सावलीत....                     विजय बिळुर                     २०१६