Skip to main content

माये

माये , य माये..

आर पुढं बोलशील का न्हायी आता ?
कवाधरनं नुसतं बकरीच्या पिल्लावानी माये माये करत घुटमळतुयास..

तुझं माझं कसं लगीच जमलं ना ग नातं .

म्हंजी ?

तुला लेकरु नाही आन मला आय. शिळ्याला नासकं मिळाव तस ना ...

का रं पोरा. काय मरीआई शिरली का अंगात तुझ्या ? उलटा काहुन ईचार करतुयास. त्यापरीस असा इचार कर. तु हरवला व्हतास मागच्या जन्मात आन हया जन्मात घावलास मला...

म्या तसा लाख ईचार करीन गं. पण माये तुझ्या  पोटातली कुस उजल्याची निशाणी कुठुन आणशील गं.

का रं ? लयच त्वांड चालायलय तुझं ? नसल रहायच माझ्यासंग तर जा निघ मग ईथनं

तस नाय गं माये.समज उद्या माझी खरी माय आली आन मला घेऊन निघाली तर..
तवा काय करशील ? बोल...आगं बोल की..

खात्री करीन. चार-दोन मुकं घेईन आन पाठवुन लावीन तिच्यासंग. दुसरं काय करणार तवा

पर मला तुझ्यासोबतच राहयाचं आसल तर..

तु काय माझी परीक्षा बघतुयस काय रं ?
ज्याची त्याची गोष्ट ज्याची त्यालाच मिळाया पाह्यजेल बघ.तिचा हाईस तर तिच्याकडच जाया पाह्यजेल तु..

पर तरीबी, मला तुझ्यासोबतच राहयाचं आसल तर...

ते तुझ्या खऱ्या आयलाच ईचार मग ..

ती न्हायी ऐकली तर..?

जा मग तिच्या मागनं मागनं

नसल जायच तर..?

हुशश्श्ह्ह्ह्ह् , मग म्या काय करायला पायजेल ते तरी सांग म्हंजी तुझं समाधान व्हईल

मला बी नाही माहीत

मग का मगाधरनं माझं डोस्क खातुयास रं बाबा ? किती पिरिम करती आन किती न्हायी ते बघायच व्हत का ?

तसं न्हाय माय

मग कसं ? आं

मला वाटायच मायला कायबी आवघाड नसतं. तीला समदं येतं . पर आज कळलं बघ माये. तुम्हास्नी बी न सुटणारी कोडी हायती बग जगामंधी. पर तुम्ही समदं सोप असल्यासारख दावत असता लेकरा -बाळास्नी. व्हय ना गं माये ?....

तु कणच्या तरी मास्तराचच पोरगं आसशील बघ ? चल आता बिगी बिगी...डोस्क ठणकाया लागलं माझं


Comments

Popular posts from this blog

रेगोटया

रेगोटया मारुन मी कधी चित्र नाही काढले मी काढल्या फक्त मनातल्या भावना चित्र आप्सुकच बनत गेले... रगंवण्या चित्र नव्हते रगं मी नुसते रगाचें नाव लिहीत गेलो खोडुन का मिठवाव्या म्हणुन मी चुकाही कागदावरच ठेवत राहीलो बडया चित्रकारांच्या प्रदर्शनाबाहेर मीही माझे चित्र विकाया बसलो ना घेतले कुणीच ते बेरगं चित्र म्हणत मग परतता घरी आधंळयाने ते घेतले विकत                                -  विजय बिळुर                                   ०८ जुलै २०१६

भाकरी

भाकरीच्या तुकड्याचा फक्त प्रश्न होता त्यांनी जातीपातीच्या दंगलीत आमची चुलच जाळली.... जळणाऱ्या पोटाला आन हंबरणार्या ओठाला बघत मग आय बा दोघ बी वाळली.....

म्रुगजळ

पाखरास मिळेना झाड बाधांवया घरटे शोधुन शोधुन दमले बिचारे होई झाडाचें भास नुसते थकुन बिचारे बसले आडोशाला एक पखं वर करुन स्वताच्याच सावलीत....                     विजय बिळुर                     २०१६