म्या देवासमोर
हात जोडुन देवाला
म्हटलं
यंदा पीक जोमात आलय
हे पहीलं कणीस तु खा
तो गपच व्हता........
दुस-या वर्षी म्हटलं यदां
कायबी ऊगवलं नाय
हे पहील आणि शेवटचं
कणीस तुला
तु खा
तो तव्हाबी गपच होता.....
तिस-या वर्षी गेलो
आणि जाताना कणीस आन
काठी घेऊन गेलो
खातु का नाय रं आं
तो तवाबी गपच व्हता....
मग चौथ्या वर्षी गेलोच नाही
तर त्यानं त्येचा
माणुस पाठवला
तवा पासनं शेतं आन म्या
दोघंबी मरुन पडलोय
- विजु
हात जोडुन देवाला
म्हटलं
यंदा पीक जोमात आलय
हे पहीलं कणीस तु खा
तो गपच व्हता........
दुस-या वर्षी म्हटलं यदां
कायबी ऊगवलं नाय
हे पहील आणि शेवटचं
कणीस तुला
तु खा
तो तव्हाबी गपच होता.....
तिस-या वर्षी गेलो
आणि जाताना कणीस आन
काठी घेऊन गेलो
खातु का नाय रं आं
तो तवाबी गपच व्हता....
मग चौथ्या वर्षी गेलोच नाही
तर त्यानं त्येचा
माणुस पाठवला
तवा पासनं शेतं आन म्या
दोघंबी मरुन पडलोय
- विजु
Comments
Post a Comment