Skip to main content


जेव्हा तुटलेल्या झाडाखाली
आपण कोणतीतरी अनोळखी
सावली शोधत बसतो बराचवेळ
शेवटी थकुन एखादं
सुकलेलं पान घेऊन येतो
रसत्यावरुन दारात
आणि ठेवतो टेबलावरील
सुकलेल्या फुलापानांच्या
फ्लॉवरपॉटमधे

अशा हजारो सुकलेल्या पानांची
एक बाग तयार झालेली असते घरात
लोक त्याला कचरा म्हणतात

आयुष्याला कंटाळलेली
थकुन भागुन आस-याला आलेली
मन तुटलेली, रंग ऊडालेली
जीर्ण झालेली पखं आता
शिंप्यालाही शिवणं अवघड झालेली
अनाथ असलेली बरीचशी
फुलपाखरं येतात ईथं
निवांतपणे मरायला

काही मुंग्याही येतात
पोरगा सांभाळत नाही
तुम्ही रहायला जागा देता कळलं
म्हणुन आलो दोघं
आहे का जागा जराशी ?
हवतरं मी बाहेर राहीन
हिला सहन होत नाहीए आता गारवा
तिला राहु दया आत म्हणत

माणसं वेळेत देत नसतील भाडं
पण ही वेळेत देतात आणुन
नाहीच जमलं तर मग बदल्यात
घरातली कोपरी साफ करतात

एकएकाला जागा देत
मग एकदिवशी मीच
उबंरठयावर येऊन ठेपतो
तरी जागा देणं काही थांबत

जेव्हा खुप काहीतरी
पोळुन निघतं आतल्याआत
आणि त्याची पुसटशी
ओळखही होऊ देत नसतो
आपण कोणालाच
तेव्हा प्रकर्षाने जाणवतं
की आपल्यालाही एक मन आहे...

Comments

Popular posts from this blog

रेगोटया

रेगोटया मारुन मी कधी चित्र नाही काढले मी काढल्या फक्त मनातल्या भावना चित्र आप्सुकच बनत गेले... रगंवण्या चित्र नव्हते रगं मी नुसते रगाचें नाव लिहीत गेलो खोडुन का मिठवाव्या म्हणुन मी चुकाही कागदावरच ठेवत राहीलो बडया चित्रकारांच्या प्रदर्शनाबाहेर मीही माझे चित्र विकाया बसलो ना घेतले कुणीच ते बेरगं चित्र म्हणत मग परतता घरी आधंळयाने ते घेतले विकत                                -  विजय बिळुर                                   ०८ जुलै २०१६

भाकरी

भाकरीच्या तुकड्याचा फक्त प्रश्न होता त्यांनी जातीपातीच्या दंगलीत आमची चुलच जाळली.... जळणाऱ्या पोटाला आन हंबरणार्या ओठाला बघत मग आय बा दोघ बी वाळली.....

म्रुगजळ

पाखरास मिळेना झाड बाधांवया घरटे शोधुन शोधुन दमले बिचारे होई झाडाचें भास नुसते थकुन बिचारे बसले आडोशाला एक पखं वर करुन स्वताच्याच सावलीत....                     विजय बिळुर                     २०१६