Skip to main content

तुटलेला चेष्मा

आज तुझ्या माझ्यातलं बोलणं थांबलय..खर तर माझं.

मलाही नव्हतं वाटलं मी ईतक्या लवकर असा शांत होईन. दोघात धुकं पसरलय दाट. मला काहीच दिसत नाहीए. तुला बरचसं दिसतय. मी प्रेम करायला कमी पडलो ना गं ? बघ ना आताही मी रुसुन बसलोय आणि तु मी बोलण्याची वाट पहात थांबली आहेस. आजवर खुपवेळा अबोला धरला आपण पण लगेच बोलणं व्हायचं ग आपल्यात. यावेळीच खुप ऊशीर होतोय मला.

मला ईकडे अंडमिट करुन घेतलय डॉकटरानीं. डिस्चार्ज मिळाला की येईन. तोपर्यतं माझा चेष्मा तु वापर. तुटलेला चेष्मा दोरीने बाधुंन किती दिवस वापरणार गं तु. फार दिवस नाही ऊरलेत हा विचार नको करुस. त्रास होतो ना तुला. व्रद्धास्रमात असतीस तर एव्हाना दिला असता तुला नविन. पण दोघांचा अटटाहास. आपण काढुयात दिवस कसे तरी. आपली जागा दुस-या गोगलगाईना मिळु देत.

म्युन्सिपालिटीवाले आले तर बघ विनवणी करुन झोपडी नका तोडु म्हणुन. त्यानां सागुं नको पोराचं नाव तो तिथं साहेब आहे. त्याचा मान पान कमी होता कामा नये. नाव गाव विचारलं तर सागं तुला आवडेल ते. नाहीच ऐकलं तर रामाच देऊळ आहे त्याच्या पाठी कटडा आहे. तिथुनं कोणी नाही ऊठवणार. तिथ जा...
        
         तसही राम काळजी घेईल तुझी. सीताही असेल सोबत. तिला कळेल नव-यापासुन दुर रहाण्याचा विरह. तीन विचारलं कुठे गेलेत तुमचे तर सागुं नको हा काहीच. तिला सांग येतील ईतक्यात. तसही तु तेच सांगते आहेस गेल्या १६ वर्षापासुन.
          
        कधीतरी घराकडं फेरी मार. चाफ्याच झाड बघुन येत जा अधुनमधुन. लग्न करुन आलीस तेव्हा आवडीने लावलेलस तु. म्हणायचीस रोज एक केसात माळला तरच चहा देईन. १६ वर्षापासुन नाही माळला गं केसात. पण तु मात्र रोज चहा करुन कपात भरुन ठेवतेस न चुकता मी येईन . पिऊन टाकेन.
          
         पैसै सपंले का गं ?
मी पण काय बावळट आहे. ईतकेदिवस कसे पुरतील पैसै. तु कोणाकडे हात पसरणार नाहीस कल्पना आहे. जेवणाच कस करतेस गं. ए ऊपाशी नको राहत जाऊ गं बाई. तु ऊपवास खुप पकडतेयस कळलं. तुलाही अँडमिट व्हायचय म्हणुन ना ? स्वताहुन नको ना गं आजारी पडु. काहीतरी ऐकत जा.

मी आहे तिथच तुझ्याजवळ. मुक्काम मोठा आहे हं. समजुन घे ना. नको कावरी बावरी होऊस. जास्त नको गं हिडुं फिरु. आठवण आली तर मी म्हणायचो ते गाणं म्हण...

      
मन भवती तुझ्या
फिरतय फिरतय गं
पैजंणाची छनछऩ
ऐकतय ऐकतय गं
हळुच हसतय येड्यावानी
मन गुतंल तुझ्यात तुझ्यात गं....

मला ईकडे गाणं म्हणायला परवानगी नाही. तरीही गुणगुणत असतो अघुनमधुन. नातंवडं दिसतात का गं.
कि नांतवडांचीही अडचण त्यानां...
असो मला पण तुला भेटावसं वाटकय गं. ईकडे खुप सिकयुरीटी असते गं नाहीतर केव्हाच आलो असतो. तरी प्रयत्न करीन.

तु हसत रहा. छान. तु रडलीस की मला रडु येतं माहीतय ना. बडबडत रहा. आणि म्हातारे रात्री थडीं वाजली तर मला घेतलेला मफलर वापर. जपुन ठेवुन नुसत बघत राहुन थोडीन मी असणार आहे. निदान घातलस तर माझी ऊब जाणवेल घामाचा वास तरी मी असल्याची जाणीव करुन देईल.

चल. काळजी घे. जास्त बोलुन देत नाहीत. काही अडचण आली तर मी येऊपर्यतं तुच खबींर होऊन तोंड दे.
नको घाई करु ईकडे येण्याची. वेळ आहे तुला.......



मी नसलो जरी सोबत
तरी हरु नको कधी
बुडबुडे जातातच
पाण्यावरले आपुले
प्रतिबिंब सोडुन...

सुकलेलं पानही गळतेच गं
सलते आठवण तरी
जगावेच लागते गं......

अंतर दुर
पत्ता नाही माहीत कोणासच
माहीती पत्ता जरी
पत्र ती पोहचत नाहीत
वाटले तरी दयावे पत्र
तर घेऊन स्वतासच यावे
लागते गं......

पदरावरचे फुल
नको कोमेजवु तु गं
पाखरु नसले भोवती तरी
फुलावे लागतेच गं.....




- विजय बिळुर.
Copyright@ vijaybilur8149
Date. 04/नोव्हेबंर/2016.
Time- 12:44
Vijufeellings.blogspot.com


Comments

Popular posts from this blog

रेगोटया

रेगोटया मारुन मी कधी चित्र नाही काढले मी काढल्या फक्त मनातल्या भावना चित्र आप्सुकच बनत गेले... रगंवण्या चित्र नव्हते रगं मी नुसते रगाचें नाव लिहीत गेलो खोडुन का मिठवाव्या म्हणुन मी चुकाही कागदावरच ठेवत राहीलो बडया चित्रकारांच्या प्रदर्शनाबाहेर मीही माझे चित्र विकाया बसलो ना घेतले कुणीच ते बेरगं चित्र म्हणत मग परतता घरी आधंळयाने ते घेतले विकत                                -  विजय बिळुर                                   ०८ जुलै २०१६

भाकरी

भाकरीच्या तुकड्याचा फक्त प्रश्न होता त्यांनी जातीपातीच्या दंगलीत आमची चुलच जाळली.... जळणाऱ्या पोटाला आन हंबरणार्या ओठाला बघत मग आय बा दोघ बी वाळली.....

म्रुगजळ

पाखरास मिळेना झाड बाधांवया घरटे शोधुन शोधुन दमले बिचारे होई झाडाचें भास नुसते थकुन बिचारे बसले आडोशाला एक पखं वर करुन स्वताच्याच सावलीत....                     विजय बिळुर                     २०१६