मी ट्रेनमधे
नेहमीप्रमाणे
झाडेच धावताहेत
मी आणि ट्रेन
एकाचजागी....
कोणीतरी झोकुन देऊन
झोपलय खिडक्याच्यां
गजंलेलया सळ्यांवर....
ईथे तबांखुच्या
निमीत्ताने दुर असलेले
हात एकत्र येताहेत...
एक मादक मुलगी
केस सावरता सावरता
दमुन गेलेय....
कोणीतरी कागदपेन
घेऊन हिशेब करतय
अगदी हिशेबासाठीच्या
कागद पेनाचाही हिशेब त्यात....
अपगांची वारी
या ट्रेनमधुनच जातेए
त्यानां विठ्ठल रोज भेटतो
दक्षिणा देऊन ते
पुढच्या प्रवासाला मोकळे होतात..
मी मात्र
शांतपणे withaout Tickit
प्रवास करतोय
चेह-यावरती कोरडे भाव आणुन
कारण Tc ने मला पकडुन
ट्रेनमधुन बाहेर काढु नये
- खाडाखोड
नेहमीप्रमाणे
झाडेच धावताहेत
मी आणि ट्रेन
एकाचजागी....
कोणीतरी झोकुन देऊन
झोपलय खिडक्याच्यां
गजंलेलया सळ्यांवर....
ईथे तबांखुच्या
निमीत्ताने दुर असलेले
हात एकत्र येताहेत...
एक मादक मुलगी
केस सावरता सावरता
दमुन गेलेय....
कोणीतरी कागदपेन
घेऊन हिशेब करतय
अगदी हिशेबासाठीच्या
कागद पेनाचाही हिशेब त्यात....
अपगांची वारी
या ट्रेनमधुनच जातेए
त्यानां विठ्ठल रोज भेटतो
दक्षिणा देऊन ते
पुढच्या प्रवासाला मोकळे होतात..
मी मात्र
शांतपणे withaout Tickit
प्रवास करतोय
चेह-यावरती कोरडे भाव आणुन
कारण Tc ने मला पकडुन
ट्रेनमधुन बाहेर काढु नये
- खाडाखोड
Comments
Post a Comment