होळीच्या जळण्याचा
ईतका धुर होता की,
आज कुणीच कोणाला
जवळ असुनही दिसलो नाही.
तीला मी, मला चद्रं,
चद्रांला ती, तिला चंद्र,
चद्रांला मी, मला ती....
तो जाळ विझला पण
मनात होळी पेटवून.....
रेगोटया मारुन मी कधी चित्र नाही काढले मी काढल्या फक्त मनातल्या भावना चित्र आप्सुकच बनत गेले... रगंवण्या चित्र नव्हते रगं मी नुसते रगाचें नाव लिहीत गेलो खोडुन का मिठवाव्या म्हणुन मी चुकाही कागदावरच ठेवत राहीलो बडया चित्रकारांच्या प्रदर्शनाबाहेर मीही माझे चित्र विकाया बसलो ना घेतले कुणीच ते बेरगं चित्र म्हणत मग परतता घरी आधंळयाने ते घेतले विकत - विजय बिळुर ०८ जुलै २०१६
Comments
Post a Comment