Skip to main content

मास्तर

• मास्तर


पोरानीं पकडुन साळत आणलं
तवा मास्तर म्हणाल
साळा का बुडवतुस रं भाडया ?

पोरगं गपगुमानं म्हणालं
आईष्याची ईधानसभा झालीया मास्तर
बोलणा-याच ऐकुन कुणीच घेत न्हायी
नुसताच गोधंळ हाती कायबी लागत न्हायी
ईरोध करायचा म्हणुन केवळ
दुख येत्याती बघा हलगी वाजवत . . . . . . . .

तयार केलाय पक्ष म्हटल्याव
चालवावच लागत हरलु तरी जिकलु तरी
तसच चाललया बघा आईष्याचं
जगावच लागतया रोज हारतु तरी . . . . . . .

जुन्या नोटा बदलुन नव्या केल्या तसं
अंगावरची कापड काय बदलता न्हायी
आली बघा मास्तर
आयबा जन्मापासुन प्रामाणिक म्हणुन
रातोरात कोणाच्या शेतातल
चोरुनबी न्हायी खाता आलं बघा
मत खात्यात तसं मास्तर . . . . . . .

पक्ष बदलत्यात सहज
तसा गाव बी बदलुन बघितला
तिथ आधीपासनच ऊपाशी समदी
म्या नवा तिथ मला कुठुन खाया मिळणार
म्हणुन पुन्हा गाव बदलला मास्तर . . . . . .

देवा धर्माच्या जाती-पातीच्या
नावान घोषणा दिल्याकी तवा कुठ
कुणीतरी भाकर वाढत बघा मास्तर
पण, पुढच्या येळला त्याच
घोषणा माझ्या आधी कुणीतरी देऊन
भाकरच पळवतो बघा मास्तर . . . . . . .

नुसतीच भीक मागतुया वाटु नयी म्हणुन आश्वासनाचा राडंबाजार बी खोलला
आलती गि-हाईक बरीच पर
ईरोधीपक्षान तिथबी
बलात्काराची केस ठोकली
आपलीच बायको पाठवुन . . . . . . .

नग कुणाचीच संगत म्हणुन
अपक्ष ऊभ राहुन बघितल
पर मतच मिळालं न्हायी
आस झालं बघा मास्तर . . . . . .

पॉटात न्हायी काय तर
मास्तर साळा कुणाला आवडल व
न्हायी आलु साळत की
साळाद्रोही म्हणुन बोलायलाबी
कमी करत न्हायी बघा मास्तर . . . . . . . . .

दयाव लागत मत
नसल दयायच तरी
तसा पेपर तेवढ देऊन जातु बघा
प्रश्न चुकीची हायती
माहीत असुनबी मास्तर . . . . .

निकाल यतुया तवा
Income tax ची रेड पडुन
सापडलेलंबी लुटुन न्हयावं
तस होतया बघा मास्तर . . . . .

पास झालेली यडावुन दाखवत्यात
नापास झालेली पुढल्या येळला बघतु म्हणत्यात
माझं काय मास्तर म्या तर फुकटचा डिबार झालु
शिकायच की दाखला काढुन घ्यायचा
हा सवाल राजकारणारासारखा बघा मास्तर ?


                                     - विजय बिळुर
                 Copyright@vijaybilur8149..

Comments

Popular posts from this blog

रेगोटया

रेगोटया मारुन मी कधी चित्र नाही काढले मी काढल्या फक्त मनातल्या भावना चित्र आप्सुकच बनत गेले... रगंवण्या चित्र नव्हते रगं मी नुसते रगाचें नाव लिहीत गेलो खोडुन का मिठवाव्या म्हणुन मी चुकाही कागदावरच ठेवत राहीलो बडया चित्रकारांच्या प्रदर्शनाबाहेर मीही माझे चित्र विकाया बसलो ना घेतले कुणीच ते बेरगं चित्र म्हणत मग परतता घरी आधंळयाने ते घेतले विकत                                -  विजय बिळुर                                   ०८ जुलै २०१६

भाकरी

भाकरीच्या तुकड्याचा फक्त प्रश्न होता त्यांनी जातीपातीच्या दंगलीत आमची चुलच जाळली.... जळणाऱ्या पोटाला आन हंबरणार्या ओठाला बघत मग आय बा दोघ बी वाळली.....

म्रुगजळ

पाखरास मिळेना झाड बाधांवया घरटे शोधुन शोधुन दमले बिचारे होई झाडाचें भास नुसते थकुन बिचारे बसले आडोशाला एक पखं वर करुन स्वताच्याच सावलीत....                     विजय बिळुर                     २०१६