आज मात्र ते घरला
कोरया पाटीनिशीच परतल
चड्डीच तुटल्याल बकल
मुठीत घेऊन
आन जाऊन बसल
कोप-यात
रडत नव्हतं बोलत नव्हतं
इचारल पोट्या काय र झाल ?
म्हणाल आय
सरकारन वह्या पेन वाटल्याती
आज वर्गात
आय म्हणाली मग
आता चुकल्याल
खोडता नाय येणार
वर्षभर चुकल्यालच
उठून दिसत राहणार
ठीगळ लावलेल्या
चड्डीसारख .........
रेगोटया मारुन मी कधी चित्र नाही काढले मी काढल्या फक्त मनातल्या भावना चित्र आप्सुकच बनत गेले... रगंवण्या चित्र नव्हते रगं मी नुसते रगाचें नाव लिहीत गेलो खोडुन का मिठवाव्या म्हणुन मी चुकाही कागदावरच ठेवत राहीलो बडया चित्रकारांच्या प्रदर्शनाबाहेर मीही माझे चित्र विकाया बसलो ना घेतले कुणीच ते बेरगं चित्र म्हणत मग परतता घरी आधंळयाने ते घेतले विकत - विजय बिळुर ०८ जुलै २०१६
Comments
Post a Comment