बलात्कार काय फक्त स्त्रीयांवरच होतात का ? पुरुषावंर होत नाहीत का ?
स्त्रीयांचे विषय माडुंन , त्यानां सहानुभुती देऊन ब-याचजणानीं बरचकाही कमवलय. आणि अजुनही तेच मांडुन कमवताहेतही आणि कमवत रहाणारही आहेत. आजकाल बरेच shortfilm निघतात मुलींवर होणा-या अत्याचाराबद्दल. सगळया जगाला कळलय माहीतय मुलींवर अत्याचार होताहेत तेच तेच दाखवुन धंदा कसला चालवताय रे स्वताचा.
एखादया मुलीवर बलात्कार झाला की सगळे येतात आपली पोळी भाजुन घ्यायला. बलात्कार झाला म्हणुन तिला जेवढा त्रास झाला नसेल तेवढा नंतर होणा-या चर्चेनी , ऊलटसुलट बोलण्यानी होत असेल तिला. किती खोट जगायचय. सगळ कळतय सगळे खोटे जगताहेत. पण बोलल तर वाईट होऊ म्हणुन मुक गिळुन गप्प.मुलीबददल सहानुभुती दाखवणा-यातले कितीजण खरे प्रामाणिक असतात.
आणखीन एक म्हणजे सगळे पुरुष वाईट, सगळे एका माळेचे मणी अस एक आजकाल खुप बोलल जातय. या सगळया पुरुषांमधे तुमचा वडील, भाऊ, काका, मामा, आजोबा येत असतीलच ना. स्त्रीया काय फार सज्जन प्रामाणिक गरीब गाय वाटतात का ? किती तरी स्त्रीया पुरुषावंर बलात्कार करतात. त्याच्यांसाठी बनवलेल्या नियंमाचा गैरफायदा घेतात.फक्त या गोष्टी तितक्या ऊघडकीस येत नाहीयेत. कारण स्त्री हा विषय मांडुन जितक कमवता येत तितक पुरुष मांडुन नाही कमवता येणार.
एकतर स्त्री-पुरुष दोघं वाईट आहेत. नाहीतर दोघही चांगले आहेत. कुणी एक, चांगल कुणी एक वाईट अस नाही. स्त्रीयानींही जरा भानावर यावं. स्वतावर अत्याचार होऊ नये असं वाटत असेल तर कोणा पुरुषावर अवलंबुन राहु नका. तुम्ही strong व्हा.
नौंटकीतुन कधीच न्याय मिळत नाही. फक्त आशा रहाते. मजा मिळते. खोट ते खोटच. जरा शहाण्यासारख वागा. दोघही एकमेकासाठी बनलेले आहेत. वैर करुन, अंतर राखुन सगळ नाश होईल. Stand up घ्या. मुळापासुन ऊपटुन काढा त्या भडव्यानां जे भांडवल करतात तुमच्या दुखांच. पुरुषानों तुम्हीही अन्याय सहन नका करु स्त्रियांचें.
कुणीच कोणाचे नको.
रेगोटया मारुन मी कधी चित्र नाही काढले मी काढल्या फक्त मनातल्या भावना चित्र आप्सुकच बनत गेले... रगंवण्या चित्र नव्हते रगं मी नुसते रगाचें नाव लिहीत गेलो खोडुन का मिठवाव्या म्हणुन मी चुकाही कागदावरच ठेवत राहीलो बडया चित्रकारांच्या प्रदर्शनाबाहेर मीही माझे चित्र विकाया बसलो ना घेतले कुणीच ते बेरगं चित्र म्हणत मग परतता घरी आधंळयाने ते घेतले विकत - विजय बिळुर ०८ जुलै २०१६
Comments
Post a Comment