जुनी घंटा -
( रंगमचावर मी ऊभा. पडदा सरकला. अधांर. कोणताच प्रकाश नाही. )
आज तुझी प्रकर्षाने आठवण झाली आणि बोलत केलस मला तु. मी खुपवेळा वा-याशी बोलत होतो आज एकटाच. तु ईतकी का चुकलीस. तुला चांगल काय वाईट काय दरदिवशी कधी तुझ्यासोबत बसुन, कधी फोनवरुन तर कधी मैसैजवरुन समजावुन सांगत होतो ना गं. किती चुका कराव्या यालाही लिमिट असतं गं. सहनशक्तीच्या हजारपट पलीकडे जाऊन तुझ्या सगळया चुका केवळ तुला वडील नाहीएत, तुला समजावुन सांगणार कोणी नाही म्हणुन तु भरकटली आहेस या एक गोष्टीपोटी सहन करत आलो होतो ना गं. तुझ्याच मैत्रीणी येऊन म्हणायच्या विजु तिला सोड तिला नाही कळणार तुझ खर प्रेम मी तुला शेवटपर्यंत साथ देईन...तुलाही हे माहीत होत. तरीही तीन वर्ष तु आज बदलशील ऊदया बदलशील म्हणुन वाट बघतच आलो. तु बदललीच नाहीस.
बरं तुझ्यासारखी मुलगी माझ्याच आयुष्यात का यावी हाही खुप मोठा सवाल. बर आलीए आता तर तिला बदलवुया हा मुर्खपणा मी केलाच आणि बघा आता तु सुखात आणि मी किती झुरतोय. रोज नाही येत बर का आठवण. कारण मी झालं गेल ते विसरुन लगेच पुन्हा रगंमचावर ऊभा रहाणारा कलाकार आहे. कारण Blackout झाल्यावर थोड थाबुंन पुन्हा नाटक सुरु करावच लागतं.
आजही तुझ नाटक पहायला खुपजण गर्दी करताहेत. माहीतेय मला. माझ्या नाटकात मात्र मी एकटाच सगळं. पात्र, प्रेक्षक, नेपथ्य, पार्श्व संगीत देणाराही मीच. पण अंग ऊघडी पाडणारी नाटकं गल्ला कमावतात ईजजत नाही लक्षात ठेव. कालपरवा पर्यन्त एकटाच मी. पण आजकाल येतात प्रेक्षक. मी तुझ्यासोबत आयुष्यभरासाठी काम करायला तयार आहे तुझ्या नाटकात म्हणत. मी तिला म्हणतो लक्षात ठेव. माझ्या नाटकात कोणताही मेकअप नसतो, वेशभुषा नसते, रगंमचावर मी सोडुन काही नसतं. जे आहोत जसे आहोत तसच राहुन मी नाटक करतो. तुला जमेल का. काही हो म्हणतात चालेल. तर काही निघुन जाताच परत.
धाडस नाही होतय गं कोणाला सोबत घेऊन आयुष्याच नाटक करायला. फक्त एकच कारण माझ्या सोबत काम करणा-या पात्रानं मला कधी सोडुन जाऊ नये. गेल तर. परवा परवा असही कानावर आलं की तुला तुझ्या प्रेक्षकानी दगा दिला. आणि तु माझ्या नाटकाचीं आठवण काढलीस म्हणे. लक्षात ठेव परत यायची विचारही करु नकोस. कारण आता मीही अभिनय किती खरा किती खोटा जाणतो. जेव्हा रंगमचावर कसं वावरायच असतं किती Natural अभिनय करायचा असतो हे सांगत होतो तेव्हा तु रंगमचापाठी Backstage ला माझ्याच नाटकाचीं पोस्टर्स फाडत होतीस.
खुपवेळा सागिंतल होत ना गं. समजुन घे नाटक. खरा अभिनय कर. चार पैसै कमी मिळतील, हौसमौज कमी होईल पण अभिनय खरा असु दे. आता बघितलस ना तुझं नाटक बदं पडत चाललय तर कुणी एकही तुझा प्रेक्षक तुझ्यासोबत काम करायला तयार नाहीए. लोक लुटतात गं लुटायला मिळाल की. किती लुटु दयायच, काय लुटु द्यायच आपल्या हातात असतं गं.
मी अजुनही एकटाच नाटक चालवतोय. तु काम करणं सोडल्यापासुन पण बघ. तुझ्या माझ्यात किती फरक. तुझं नाटक बदं पडल माझं अजुन चालतय. आता तरी खरा अभिनय कर. एकपात्री तरी....
Blackout....
Copyright@vijaybilur8149
Ratnagiri. 24 march 2017
Time 8:20
रेगोटया मारुन मी कधी चित्र नाही काढले मी काढल्या फक्त मनातल्या भावना चित्र आप्सुकच बनत गेले... रगंवण्या चित्र नव्हते रगं मी नुसते रगाचें नाव लिहीत गेलो खोडुन का मिठवाव्या म्हणुन मी चुकाही कागदावरच ठेवत राहीलो बडया चित्रकारांच्या प्रदर्शनाबाहेर मीही माझे चित्र विकाया बसलो ना घेतले कुणीच ते बेरगं चित्र म्हणत मग परतता घरी आधंळयाने ते घेतले विकत - विजय बिळुर ०८ जुलै २०१६
Comments
Post a Comment