Skip to main content
तसही
वजा होण्यासारखं
काय ऊरलय आयुष्यात
अधिक व्हायला
तु तयार नाहीएस

गुणाकार होण्याएवढं
नशीब कुठलं माझं
झाला तर भागाकारच गं....

नको यातलं काही म्हणुन
सगळी आकडेमोड सोडुन
आता शुन्य झालोय
वहीच्या मागच्या पुठठ्यावर.....

वाटलं तुला राहु दयावं तर
ठिक नाहीतर
पुठठ्यावरचा कागद काढ
मीही जाईन आपोआप
प्लास्टिकसोबत....

Comments

  1. शुन्याचं अत:करण तुलाही कळलं मित्रा!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

रेगोटया

रेगोटया मारुन मी कधी चित्र नाही काढले मी काढल्या फक्त मनातल्या भावना चित्र आप्सुकच बनत गेले... रगंवण्या चित्र नव्हते रगं मी नुसते रगाचें नाव लिहीत गेलो खोडुन का मिठवाव्या म्हणुन मी चुकाही कागदावरच ठेवत राहीलो बडया चित्रकारांच्या प्रदर्शनाबाहेर मीही माझे चित्र विकाया बसलो ना घेतले कुणीच ते बेरगं चित्र म्हणत मग परतता घरी आधंळयाने ते घेतले विकत                                -  विजय बिळुर                                   ०८ जुलै २०१६

भाकरी

भाकरीच्या तुकड्याचा फक्त प्रश्न होता त्यांनी जातीपातीच्या दंगलीत आमची चुलच जाळली.... जळणाऱ्या पोटाला आन हंबरणार्या ओठाला बघत मग आय बा दोघ बी वाळली.....

म्रुगजळ

पाखरास मिळेना झाड बाधांवया घरटे शोधुन शोधुन दमले बिचारे होई झाडाचें भास नुसते थकुन बिचारे बसले आडोशाला एक पखं वर करुन स्वताच्याच सावलीत....                     विजय बिळुर                     २०१६